फिजिक्स विषयी थोडे काही

फिजिक्स या विषयाबद्दल आज शैक्षणिक क्षेत्रात अनेक गैरसमज आहेत. बरेच विद्यार्थी व त्यांचे ऐकून काही पालक या विषयास अत्यंत कठीण विषय मानतात हे आपण समजू शकतो, परंतु बरेच शिक्षकदेखील या विषयास कठीण विषय संबोधतात हे मात्र चुकीचे. हा विषय कठीण नसून थोडा जास्त सरावाचा आहे इतके नक्की. सायन्स शिकण्याकरीता विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन असावा लागतो. असेच विद्यार्थी सायन्स आणि पर्यायाने फिजिक्स चांगले शिकू शकतात.

या विषयाची बौद्धिक गरज इतर विषयांपेक्षा भिन्न आहे हे मात्र निश्चित. लहानपणापासूनच आपण बल ही संकल्पना शिकत असतो परंतु इयत्तेनुसार या संकल्पनेची व्याख्या बदलत जाते. म्हणून ११ वी , १२ वीच्या विद्यार्थ्यांना एखाद्या संकल्पनेचे ज्ञान खालील इयत्तापासून माहीत असणे आवश्यक आहे. या विषयात केवळ व्याख्या पाठ असून चालत नाहीतर त्यांचे आर्थ स्पष्ट करतायेणे, त्यांचा इतर ठिकाणी वापर करता येणे हे अपेक्षित आहे.

हा विषय केवळ त्यालाच सोपा वाटू शकतो ज्याला चांगली आकलन क्षमता, कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती आहे. जो विद्यार्थी आपल्या एकूण अभ्यासातील निम्मा वेळ या विषयाकरिता देतो, २ वर्षे सातत्याने या विषयाचा आलेख चढता ठेवू शकतो, या विषयाच्या आभ्यासाशिवाय दुसरा पर्यायच नाही हे ज्याला माहित आहे तोच विद्यार्थी कोणतीही प्रवेष परीक्षा यशस्वी होवू शकतो हे निश्चित.

 आमचे उपक्रम
 • दररोज दोन तास डिफिकल्टी सॉल्व्हिंग पिरियड
 • ऑनलाईन एक्झाम
 • व्हाट्सअप ने डिफिकल्टी सॉल्व्हिंग
 • वर्षातून चारदा पेरेंट मीटिंग
 • प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष
 • नीट जेईई सीईटी तसेच बोर्ड परीक्षा वेगवेगळ्या घेतल्या जातात.
 • ११वी आणि १२वी मधील संकल्पना व्यवस्थित समजाव्यात म्हणून १०वी नंतर फाऊनडेशन कोर्स.
 • ११वी पासूनच CET चा सराव.
 • उदाहरणांचा जास्तीचा सराव.
 • दर आठवड्यास सराव परीक्षा.
 • परीक्षांचा निकाल SMS द्वारे पालकांस कळवणे.
 • शनिवार व रविवारी अडचणी सोडविण्याकरिता स्वतंत्र तासिका
 • फिजिक्स हा विषयाचा पाया पक्का करावयाचा असेल तर तो शालेय जीवनातच योग्यरीत्या शिकला पाहिजे. म्हणूनच प्रा. प्रशांत पाटील सर हे वेळोवेळी परभणीतील विविध नामांकित कोचिंग क्लासेस मध्ये जावून १० वी च्या विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन करीत असतात. •  मनोगत